चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावातील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप

0
35
चाळीसगाव/प्रतिनिधी
गुणवंत दादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून सेवा सहयोग फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम.
बाणगाव  वाघडू ,वाकडी या गावांना स्कूल किटचे वाटप.
चाळीसगाव तालुक्यात गरजू आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय स्कूल किटचे वाटप गुणवंत दादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून वाटप करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी तालुक्यातील पूरग्रस्त बाधित बानगाव वाघडू वाकडी या गावांना शालेय स्कूल किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी सेवा सहयोग फाउंडेशन चे गुणवंत दादा सोनवणे सहकुटुंब उपस्थित होते. त्याचबरोबर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर साहेब, विस्तार अधिकारी भाऊसाहेब , केंद्र प्रमुख ,लोकनायक तात्यासाहेब महेंद्र सिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुचित्रा ताई पाटील ,कळमडू येथील सामाजिक कार्यकर्ते दयारामभाऊ सोनवणे,सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे तालुका समन्वयक सोमनाथ माळी, राहुल राठोड,पंकज राठोड, नवल राठोड,योगेश राठोड कृषी विभागाचे तुफान खोत, तसेच बाणगाव, वाघडू, वाकडी या शाळेचे मुख्याध्यापक दत्त्तात्रेय मालपुरे, चंद्रकला साळुंखे, नामदेव राठोड तसेच शिक्षक सुनील मालपुरे, गणपत जाधव, मनीषा वाणी, दत्तात्रेय कोळी, सुनील वाघ, सविता पाटील तसेच कळमडू येथील पुष्पा ताई बागुल पिंपळवाड, म्हाळसा येथील सीमा मॅडम व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here