चाळीसगावात आरटीओ कार्यलय न झाल्यास उपोषण

0
13

चाळीसगाव ः प्रतिनिधी
चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय करण्यात यावे, अशी मागणी मान्य न झाल्यास शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव हरी खलाणे दि.२६ जानेवारी रोजी चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
चाळीसगाव तालुक्यात उपप्रादेशिक कार्यालय होण्यासाठी २००७ पासून माझा सतत शासनाकडे पत्रव्यवहार करत आहे. २०२१ उजाडले आहे. तरी देखील कोणीही दखल घेतली नाही. तसेच महसूलबाबत चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व पारोळा या चार तालुका मिळुन महिन्याला साडेपाच कोटी महसूल मिळत असतो म्हणून शासनाचे देखील नुकसान नाही. चाळीसगाव हा तालुका जळगाव पासून शंभर कीलो मीटर आहे तसेच चार जिल्ह्याचे ठिकाण आहे व दोन राज्यांची सीमा देखील जवळ आहे. जर एखाद्या रिक्षा मालक किंवा ट्रक मालक या व्यावसायिक बांधवांना आरटीओच्या कामासाठी जळगाव येथे जावे लागते. गेल्या नंतर एका दिवसात काम होईलच याची गॅरंटी नसते परंतु या गरीब व्यावसायिक बांधवाला त्या वाहनाचे पासिंग केल्याशिवाय पर्याय नसतो. जर यांचा आर्थिक किंवा मानसिक त्रास बघीतला तर अतिशय वाईट आहे. एखाद्या एकत्रित कुटुंबातील महिलेच्या नावावर वाहन असेल तर त्या महिला भगिनींना दुसर्‍याच्या नावावर ते वाहन करायचे असल्यास देखील जळगाव जावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here