चाळीसगावातील पूरग्रस्तांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

0
26

जळगाव, प्रतिनिधी । ढगफुटीमुळे 30 व 31 ऑगस्ट 2021 रोजी विविध नदी-नाल्यांना पूर येऊन चाळीसगावसह तालुक्यातील जवळपास 20 ते 25 गावांना त्याचा जोरदार फटका बसला. यात अनेकांच्या घरांसह विविध व्यावसायिक दालनांत पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली.

या आपत्तीग्रस्त कुटुंबांकरिता सामाजिक दातृत्व निभावत आपले कर्तव्य समजून जळगाव शिवसेनेने शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना हाक दिली. या हाकेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत विविध संसारोपयोगी वस्तू सस्नेह देण्यासाठी अनेकजण सरसावले. यामध्ये एका कुटुंबाला साधारणपणे 15 दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तूंचे किट बॉक्स 510 कुटुंबांसाठी तयार करण्यात येऊन ते रविवार, दि.5 सप्टेंबर 2021 रोजी जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून ट्रकद्वारे रवाना करण्यात आले.

त्यानंतर स्वतः महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासह शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री.संजय सावंत, जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख श्री.गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.महानंदा पाटील, महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, उपजिल्हाप्रमुख श्री.महेंद्र पाटील, सौ.प्रतिभा पवार, चाळीसगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख सौ.अनिता शिंदे, श्री.भिमराव खलाणे, तालुका प्रवक्ते श्री.दिलीप घोरपडे, चाळीसगाव तालुकाप्रमुख सौ.सविता कुमावत, श्री.रमेश चव्हाण, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्री.प्रशांत कुमावत, चाळीसगाव तालुकाप्रमुख श्री.नकुल पाटील, तालुका संघटक श्री.सुनील गायकवाड, जिल्हा उपसमन्वयक श्री.धर्मा पाटील, शहरप्रमुख श्री.नानाभाऊ कुमावत, उपशहरप्रमुख शैलेंद्र सातपुते, श्री.नीलेश गायके, एस.टी. कामगार सेनेचे श्री.रघुनाथ कोळी,अबराहरजी मुल्ला, वसीम चेअरमन, चाळीसगाव शाखाप्रमुख श्री.रामेश्वर चौधरी, श्री. राजेंद्र भालेराव, श्री.भय्या मिस्तरी, जावेदभाई, अजीज मिर्झा, युवा सेना चाळीसगाव शहरप्रमुख श्री.रवींद्र चौधरी, शहर संघटक श्री.रॉकी धामणे, वाकडीचे सरपंच श्री.प्रकाश पाटील, रोकडेचे सरपंच श्री.अमोल पाटील, पिंपरखेडचे सरपंच, शिवसैनिक सरिता माळी-कोल्हे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, ललित धांडे, अल्पसंख्याक आघाडीचे जाकीर पठाण, शैलेश काळे, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, पीयूष हसवाल, अर्जुन भारूळे यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत वाकडी, रोकडे, पिंपरखेड व चाळीसगाव शहरातील आपतीग्रस्त कुटुंबांना ते वाटप करण्यात आले. यावेळी आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना ही मदत स्वीकारताना कमालीचा गहिवर दाटल्याचे चित्र दिसून आले. काहींनी उपस्थितांसमोर आपबितीही कथन केली. या उपक्रमासाठी शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री.संजय सावंत यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी शिवसैनिक विराज कावडिया, अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, पीयूष हासवाल व त्यांच्या सहकार्‍यांचा मोलाचा वाटा राहिला.

किट बॉक्समध्ये असलेल्या जीवनावश्यक वस्तू
पीठ, सुजी, मीठ, तूरडाळ, तांदूळ, गरम मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, चहा पावडर, साखर, पोहे, लोणचे, चिक्की, खजूर, पतंजली बिस्कीट, पारले बिस्कीट, खोबरेल तेल, पॅन्ट, शर्ट, साडी, सॅनिटरी पॅड, रजिस्टर, स्टेशनरी, अगरबत्ती, फर्स्ट एड किट, सॅनिटायझर इत्यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here