भुसावळ प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन जणांवर भुसावळ बाजार पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या ठेकेदाराला तीन जणांनी धमकी व चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील गुलमोहर कॉलनीतील योगेश अशोक नरोटे (वय-२९) हे गर्व्हमेंट कॉट्रॅक्टर आहेत. योगेश नरोटे यांचे शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्स येथे त्यांचे ऑफीस आहे. २५ ऑक्टोबर नरोटे हे त्यांच्या ऑफीसमध्ये असतांना दिपक भास्कर राणे, पवन मेहरा (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती असे तिघेजण दुकानावर दुपारी १ वाजता आले. “तुला या ठिकाणी राहायचे असेल तर तुझ्या मामाकडून आम्हाला १५ लाख रूपये द्यावे लागतील. तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवून जेलमध्ये टाकू” असे सांगितले आणि चाकूचा धाक दाखवून पैश्यांची मागणी केली. याप्रकरणी योगेश नरोटे यांनी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश धुमाळ करीत आहे.