पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) या उद्या (१७ सप्टेंबरला) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी तीन दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत सुरेखा पुणेकर यांचे नाव न घेता म्हणाले होते – ‘राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.”
यावरून राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. सुरेखा पुणतांबेकर यांनी यावरून दरेकरांना टोमणा मारला “घाण तोंडाचे दरेकर भाजपामध्ये कसे?”
सुरेखा पुणेकर म्हणाल्यात, “मला दरेकराबाबत खूप वाईट वाटते. मोठे नेते आहेत पण त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? मी जर महाराष्ट्राची कला परदेशात नेली. लावणी कला घराघरात पोहचवली. अशा महिलेला दरेकरसाहेब नाव ठेवत असतील तर ते चूक आहे. महिलांना मान देऊ शकत नाही तर ठीक, पण अपमान तरी करू नका. प्रवीण दरेकर यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा याचा परीणाम वाईट होईल.”