घरकुल प्रश्न पेटला, राष्ट्रवादी काँग्रेस कडून आता निवेदन व आंदोलनाचा इशारा

0
22
मलकापूर प्रतिनिधी :तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेत ११६९३ लाभार्थ्यांची नावे प्रपत्र नमुना ड यादीनुसार मंजूर झाली असून २५३३ लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली. या सर्वांना पुन्हा यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे आणि घरकुलासाठी मिळणारी रक्कम रू. १३८००० ऐवजी रू.३००००० नव्याने मंजूर करण्याबाबतचे निवेदन आज १७ फेब्रुवारी २०२२ रोजी संतोषभाऊ रायपुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर कडून गटविकास अधिकारी, मलकापूर यांना देण्यात आले. ग्रामीण भागात वाहतुकीला अडचण असल्याने आणि आजची महागाई पाहता मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे करीता आमच्या मागण्यांना तात्काळ लक्ष देऊन पूर्ण करण्यात याव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल. यावेळी निवेदन देताना डॉ. अशोकराव सुरडकर, बाळूभाऊ पाटील, अरुणभाऊ अग्रवाल, ज्ञानदेव ढगे, युवराज रायपुरे, चेतन जगताप, राजूभाऊ डोफे, गजानन पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, अनिल रायपुरे, गणेश गायकवाड, अमित झनके, अनिल ढोले, मंगेश थोरात, अमोल ढोले, विश्वनाथ थोरात, योगेश थोरात, नाना इंगळे, गोपाळ इंगळे, राजेश झाल्टे, प्रमोद चौधरी, संदीप पवार, भारत सपकाळ, रवींद्र पवार, कृष्णा तायडे
आणि इतर राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here