सावदा-प्रतिनिधी
“सदरील घन कचरा प्रकल्प व त्याच्याशी निगडित बाबींची वृत्तसंकलन साठी पालिकेत जाऊन दि.१० जानेवारी २०२२ रोजी पत्रकारांनी चौकशी केली असता मला याची काहीच माहिती नाही माझाकडे कोणत्याच प्रकारचे बिल वगैरेचा लेखाजोखा नसून अकाउंट विभागात तुम्ही जाऊन चौकशी करावी.किंवा अर्ज टाकून माहिती विचारावी असे बेजबाबदारीचे व उडवाउडवीचे उत्तर आरोग्य अधिकारी महेश चौधरी यांनी दिल्यामागील कारण काय?यात खरोखर काही गौडबंगाल तर नाही ना?किंवा त्यांचे सदरील ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंध तर नाही ना? अशी शंका आरोग्य अधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थित होत असून याआधी देखील या आरोग्य अधिकारीच्या कार्यकाळातील भोंगळ कारभार बाबत एका विद्यमान नगरसेविकेने तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे.मात्र या दिशेने कोणतीच कारवाईची हलचल अद्याप दीसून न येणे म्हणजे थेट “कार्यालयीन फेवर” चा हे प्रकार तर नाही ना? असे सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.
जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेच्या अमाप पैसा खर्च करून बांधण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पावर गेल्या १ वर्षापासून पालिकेच्या वाहनाद्वारे शहरातील सुका, औला,सह विविध प्रकारचा कचरा संकलित करून टाकला जात असून या कचऱ्यावर प्रक्रिया केलीच जात नाही.व आश्चर्याची बाब अशी की याकडे मुख्याधिकारी सह न.पा.आरोग्य निरीक्षक महेश चौधरी आणि लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याची उदासीनता मुळे की,काय? मात्र १ वर्षापासून सदरील घनकचरा प्रकल्प कचरा प्रक्रियाच्या प्रतीक्षेत दिसून येते.हे मात्र खरे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सावदा पालिकेने आधिच घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी लाखोंचा खर्च केलेला असून येथे घनकचरा प्रक्रिया करीता आणलेल्या अत्याधुनिक मशनरीचा उपयोग होतांना दिसून येते नाही.सदरील प्रकल्पाबाबत मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक महेश चौधरी या दोघांनी धृतराष्ट्राच्या भूमिकेची सोंग घेऊन लाखोंच्या बिलाकडे दुर्लक्ष करीत असून आस्था स्वयम रोजगार सहकारी सेवा संस्था धुळे यास प्रतिमहा सरासरी ६ते८ लाखांच्या दरम्यान नियमित बिले अदा होत अरून सदर संस्थेचा व पालिकेचा करारनामा ऑगस्ट २०२१ ला संपुष्टात येऊन सुद्धा पुनच्छ पुढील कारभार या निष्क्रिय संस्थाकडे सोपविण्यात आलेला आहे.
तरी घनकचरा प्रकल्पावर झालेल्या खर्चाचा तपशील फक्त माहे नोव्हेंबर २०२१ चे रक्कम रुपये ८ लाख २५ हजार ४४८ रुपये असून या रकमेतून शासकीय नियमानुसार कपात करून रक्कम रुपये ६ लाख ४६ हजार ७०६ रुपये शिलकीचे सदरील संस्थेचे ठेकेदारास अदा करण्याचे बाकी आहे.असे न.पा.चे अकाउंट विभागातील कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतली असता वरील बाब दिसून आली आहे.महणून आता तरी पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी घनकचरा प्रकल्प ठिकाणी प्रकिया निष्क्रिय असून पालिकेकडे जमा असलेली ठेकेदाराची संपूर्ण अनामत रक्कम सह सध्याचे अदा न केलेल्या बाकी असलेले बिल सुद्धा थांबविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तरी याबाबत काही जागरूक नागरिक पुराव्यानिशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.