चाळीसगाव : प्रतिनिधी (मुराद पटेल)
तालुका व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर हातमजुरी व गरीब कुटुंब आहे. काहींना इतर रुग्णालयात पैश्याअभावी उपचार घेता येत नाही व यात अनेक रुग्ण देखील दगावतात. कोट्यवधी रुपयांचे असलेले चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय सर्व बाबीने जर उपचारासाठी खुले करण्यात आले तर त्याचा उपयोग सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल. तज्ञ डॉक्टराची नेमणूक करून अजून चांगल्या प्रकारे सेवा देण्यात यावी, असे निवेदन डॉ. मंदार करंबळेकर यांना पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आले. व रुग्णालय सुरू न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी पीपल्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ, अतुल चौधरी, मुकेश कुमावत,गौरव पाटील,कुणाल पाटील,रोशन चव्हाण, राकेश त्रिभुवन, सुरज शर्मा, बिटू अहिरे, साहिल आव्हाड, रुपेश पवार, रितेश पवार, सनी सरोदे, रोहन गायकवाड, जीवन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.मंदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अर्जुन सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळीं सांगितले.