चाळीसगाव प्रतिनिधी (मुराद पटेल)
स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया”ह्या संकल्पासह ग्रामपंचायत कार्यालय व जी.प.प्राथमिक शाळा चितेगांव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या प्रजासत्ताक राज्यात आपण सुरक्षित आहोत याचं कारण म्हणजे आपल्या देशाचे जवान आहेत,जे दिन-रात्र सीमेवर पहारा देऊन देश सुरक्षित ठेवतात म्हणून आजचे ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण ज्यांनी देशासाठी सेवा देऊन निवृत्त झाले ते गावातील माजी सैनिक सचिन उत्तमराव भोसले व जी.प.प्राथमिक शाळा चितेगांव येथील ध्वजारोहण श्री.गणेश पंढरीनाथ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले,ही ह्या कर्यक्रमाची विशेष गोष्ट होती.
याप्रसंगी गावाच्या सरपंच सौ.प्रभावतीताई गायकवाड, उपसरपंच भारत सोनवणे, ग्रा. सदस्य पंकज पाटील,अरुण मोरे मा. उपसरपंच किरण जाधव,गावाचे पो.पा.श्रीकृष्ण भोसले,ग्रामसेवक राजेंद्र वाघ भाऊसाहेब,जी.प.शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना साठे मॅडम,जागृती निकम मॅडम,प्रमिला वाघ मॅडम,अर्चना इंजे मॅडम माजी सैनिक गणेश पंढरीनाथ बाविस्कर,मा.सैनिक सचिन उत्तमराव भोसले,सुनील मोरे,शेखर गायकवाड,समाधान ठाकरे,ग्रा.शिपाई बाप्पू मरसाळे ग्रा.सेवक सागर सोनवणे,शरद सोनवणे,समाधान मोरे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते जी.प.शाळेतील विध्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका साठे मॅडम,ग्रामसेवक राजेंद्र वाघ भाऊसाहेब,ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील व शेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
शिक्षक वर्गाच्या अचूक नियोजनाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला…
