ग्रंथालय सेनेतर्फे धरणगावात सामना वाचन प्रेरणा दिवस साजरा

0
39

धरणगाव ः प्रतिनिधी
धरणगाव येथील येथील सानेपटांगणावर महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सामना वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.या निमित्ताने पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस व चित्रकला स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे प्रदेश उपप्रमुख पी.एम. पाटील सर,चर्मकार समाजाचे नेते भानुदास अप्पा विसावे,नगराध्यक्ष निलेश चौधरी, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे, उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन,माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ,अंजलीताई विसावे,गटनेते पप्पू भावे,धानोरा सरपंच भगवान महाजन,सभापती शिक्षण वासुदेव चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,अक्षय महाजन, प्रतिभा पाटील,संजय पाटील,ग्रंथालय सेना प्रसिद्धी प्रमुख योगेश पाटील,जिल्हा ग्रंथालय सेना प्रमुख प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी नवानिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी पाच वेळा आमदार व दोन वेळा मंत्री,पालकमंत्री झालो. धरणगाव व जळगाव तालुक्यात ग्रामपंचायतीत घवघवीत यश मिळाले.
या प्रसंगी गुलाबराव वाघ, भानुदासअप्पा विसावे,गोपाल चौधरी,भगवान महाजन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पी.एम. पाटील सर यांनी केले तर आभार डॉ.प्रशांत पाटील यांनी मानले.जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालय सेनेचे पदाधिकारी,सर्व नगरसेवक,शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here