गोल फाईडर पदवीने किशोर सपके सन्मानित

0
31

जळगाव : प्रतिनिधी

सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे शहरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर प्रकाश सपके यांना नुकतेच दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिका येथील लिंब्रा फायनान्स इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेतील येथील सुधा फायनान्शिअल गोल फाईंडर ही पदवी देवून सन्मानित केले आहे.
शहरात आजवर किशोर सपके यांनी टिमवन कन्सल्टन्सच्या 7 ट्रॉफ्या पटकविल्या असून आतापर्यंत  त्यांनी तब्बल 38 वेळा रक्तदान करून रुग्णांना वाचविले आहे. कोरोना काळातही त्यांनी प्लाझमा दान करूनही आपली सामाजिक सेवा अविरत सुरु ठेवली होती.
श्री.सपके यांना सन्मानित करतांना विनोद ठोळे, चंद्रशेखर आगरकर, मयुर तुपकरी, श्रीकांत देवरे, प्रभाकर बारी, अरूण जोशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here