कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरु झालेल्या महाविद्यालयाच्या प्रथमदिनी विद्यार्थ्यांंचे स्वागत करण्यात आले,त्यानंतर लगेच महाविद्यालयाच्या परिवहन समितीतर्फे प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहविचार सभा घेण्यात आली.
सहविचार सभेत प्रा.प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले,तर समितीचे अध्यक्ष प्रा.प्रविण बोरसे यांनी विद्यार्थ्यांंना आपल्या गावाहून महाविद्यालयात येत असतांना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल मार्गदर्शन केले,तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर कसा तोडगा काढावा,याबाबत मार्गदर्शन केले,आभार प्रा.दत्तात्रय भोसले यांनी मानले.
प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सहविचार सभेस प्रा.किशोर चौधरी,प्रा.दिनकर सुर्यवंशी,प्रा.प्रेमचंद चौधरी,विठ्ठल सोनवणे,संजय पाटील आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.