कोळगाव ता-भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच पुजन करुन अभिवादन करण्यात आले,तद्नंतर शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.