गुगलचे सीईओ पद्मभूषण सुंदर पिचाईंविरोधात एफआयआर

0
5

मुंबई: पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी गुगलचे सीईओ पिचाई (Sundar Pichai) आणि गुगल, तसेच यूट्यूबच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात मुंबईत निर्माता आणि दिग्दर्शक सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी मुंबईत एफआयआर दाखल केला आहे. दर्शन यांनी बॉलिवूडमध्ये सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्यासोबत ‘इंटकाम’, ‘लुटेरे’ आणि ‘जानवर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. पिचाई यांच्या विरोधात कॉपीराइटचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ जानेवारी रोजी हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यूट्यूब आपल्या चित्रपट आणि संगीताच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि त्यासाठी आपण ११ वर्षांपासून संघर्ष करत आहोत, असे सुनील दर्शन यांचे म्हणणे आहे. निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुनील दर्शनचा शेवटचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट होता.

मी गेल्या ११ वर्षांपासून हे युद्ध लढत होतो. मी सरकारकडून गुगल आणि यूट्यूबच्या बड्या अधिकाऱ्यांना अनेक पत्रे लिहिली, विनंत्या केल्या, पण कोणी ऐकले नाही. कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हते. विशेष म्हणजे माझी तक्रार नोंदवायलाही कोणी तयार नव्हते. त्यानंतर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाच्या आदेशानंतरच मी एफआयआर करू शकलो, असे दर्शन यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here