जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या तरुणाने गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला आज दुपारच्या सुमारास अटक करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी पाठलाग करून वाल्मिक नगरातून दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडील गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे (वय-२६) रा. कांचन नगर हा तरूण वाल्मिक नगरातील बगीचाच्या परिसरात गावठी बनवटीचे पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय गोपनिय माहिती मिळाली.
शनीपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोहेकॉ परिष जाधव, राहूल पाटील, प्रमोद पाटील, शरद पाटील यांनी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी लिंबू राक्याचा वाल्मिक नगर भागातील बगीचाजवळ पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातील चार हजार किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.