गांधी रिसर्च फाउंडेशन अन्‌‍‍ मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड

0
5

जळगाव ः प्रतिनिधी I येथील रामेश्‍वर कॉलनीतील हरेश्‍वरनगर भागात हनुमान मंदिराच्या परिसरात गांधी रिसर्च फाउंडेशन, मराठी प्रतिष्ठानतर्फे देशी जातीच्या 250 वृक्षांचे रोपण करण्यात आले. उपक्रमाची सुरुवात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते झाली.

हरेश्‍वरनगरात रेमंड कॉलनी जलकुंभच्या खुल्या भूखंडावर हे वृक्षारोपण करण्यात आले. उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी स्थानिक वृक्षांचे महत्त्व सांगितले. जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील अतीन त्यागी यांनीही विचार मांडले. मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. हा उपक्रम जैन इरिगेशनच्या सहकार्याने गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला. प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी, सदस्य सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वक उदय महाजन, डॉ. अश्‍विन झाला, सुधीर पाटील, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेश्‍याम मणियार, तांबापुरा फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल, अमन फाउंडेशनचे शाहिद सय्यद, दीपक मांडोळे, संदीप मांडोळे, अनिल घुले, दीपक सनांसे, विक्की कचरे, यशवंत सपकाळे, सुमीत देशमुख उपस्थित होते.

उपक्रमात 250 देशी जातीच्या वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली. त्यात बेहडा, करंज, पिंपळ, बूच, रिटा, वड, चिंच, पेल्टोफॉर्म, बकूळ, निंब, बेल, पारिजातक, कांचन, जांभूळ आदी वृक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here