Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गर्भ फुटून गंभीर झालेल्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळाले जीवनदान
    जळगाव

    गर्भ फुटून गंभीर झालेल्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळाले जीवनदान

    saimat teamBy saimat teamJanuary 8, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जामनेर तालुक्यातील पहूर येथील २४ वर्षीय महिलेच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या गर्भाशयाच्या नलिकेत गर्भ राहून तो फुटल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तत्काळ उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले.
    बर्‍याच दिवसांपासून पोटदुखी
    जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात जांभूळगाव येथील २४ वर्षीय विवाहितेला २ मुले आहेत. कुटुंब मजुरी करते. त्यावरच उदरनिर्वाह करतात. पहूर व जामनेर येथे उपचार न झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बर्‍याच दिवसांपासून महिलेच्या पोटात दुखत होते. सोनोग्राफीतदेखील काही निदान होत नव्हते.
    डॉ.बनसोडेंकडून तपासणी
    अखेर ३० डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाल्यावर स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रतज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी तपासले. महिलेच्या अंगात रक्त कमी होते. पोटात रक्त जमा झाले होते. गर्भनलिकेत गर्भ राहून फुटल्याचे निदान त्यांनी केले. त्यामुळे महिला गंभीर झाली होती. सीटी स्कॅन करण्यात वेळ न घालवता खंबीर राहिले व त्यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
    त्यांनी शस्त्रक्रिया करून पोटात जमा झालेले सुमारे दीड लिटर रक्त बाहेर काढले. फुटलेला गर्भ व गर्भनलिका शस्त्रक्रियेने काढण्यात आल्या. तसेच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना काल ७ जानेवारी रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. संजय बनसोडे यांना डॉ. अश्विनी घैसास, डॉ. प्रदीप पुंड, डॉ. शीतल ताटे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, अधिपरिचारिका नीला जोशी यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.