जळगाव, प्रतिनिधी । मनपा व पाेलिस प्रशासन रविवारच्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. मेहरूण तलाव वगळता अन्य ठिकाणी विसर्जनाला बंदी घालण्यात अाली आहे. प्रत्येकाला तलावापर्यंत पाेहाेचणे शक्य नसल्याने संकलन केंद्रांवर गणपती मूर्ती अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गिरणा काठावर निमखेडी शिवार व गिरणा पंपिंग येथे धाेकादायक स्थिती निर्माण झाल्याने तेथे विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. मेहरूण तलावावर घरगुती तसेच चार फुटापेक्षा लहान मूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटावर व्यवस्था केली आहे. चार फुटाच्या मूर्तीचे विसर्जन सेंट टेरेसा शाळेच्या बाजूने तलावावर केले जाणार आहे. रामेश्वर काॅलनीकडून गणेश विसर्जनाला बंदी घालण्यात आली असून, पाेलिस बंदाेबस्त तैनात असेल.
शिवाजीनगर पुलाजवळ मनपा शाळा क्र. १, सिव्हिलमागील साने गुरुजी वाचनालय, व. वा. वाचनालय, सत्यवल्लभ हाॅल, शकुंतला तंत्रनिकेतन विद्युत काॅलनीजवळ, निमखेडी राेडवर कांताई नेत्रालयाच्या मागे, वाल्मीकनगरात मनपा शाळा क्र. २१, पांजरपाेळ चाैकाजवळ मनपा शाळा क्र. ३, सिंधी काॅलनी वालेचा शाळा सेवा मंडळासमाेर, अयाेध्यानगरातील कासार मंगल कार्यालय, मनपा लाठी शाळा ढाकेवाडी, काशीबाई काेल्हे विद्यालय, मेहरूण साईबाबा मंदिर राेड, बाजार समितीसमाेर अजिंठा लाॅन, महाबळ चाैकाजवळ हतनूर काॅलनी मंगल कार्यालय, तडवी समाज मंगल कार्यालय शिरसाेली नाका, मेहरूण हरीशनगर, गणपतीनगरातील बेंडाळे हाॅल, संत बाबा हरदासराम मंगल कार्यालय, पाेलिस लाइन मनपा शाळा क्र. ५, ललित कला भवन रिंगराेड, माेहाडी राेडवरील हटकर समाज मंगल कार्यालय, गणेश घाटाकडे जाणारा रस्ता, पिंप्राळा चाैक, निमडी शाळा, झाेराष्ट्रीयन हाॅल गिरणा टाकीजवळ या केंद्रांवर मूर्ती संकलन केले जाणार आहे.