मलकापूर, प्रतिनिधी । गणपती विसर्जन करण्यासाठी नदीवर गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मलकापूर येथून जवळ असलेल्या निंबादेवी येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, अक्षय संदीप वानखेडे (रा. शिरसोळी ता.नांदुरा) या युवकाचा पाय घसरून नदीत पडल्याने पाण्यात बुडाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील निंबोळा या गावाजवळ घडली असून रात्री उशिरापर्यंत युवकाचे शव मिळून आला नव्हता. निंबोळा देवी संस्थांंच्या मागे विश्वगंगा नदी पात्रात गणपती विसर्जनासाठी दुपारपासून गणपती विसर्जनाचे कार्य सुरू होते. यामध्ये अक्षय वानखेडे हा युवक विसर्जन पाहण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली.