गणपती विसर्जनाला गेलेल्या बलिकेचा बुडून मृत्यू, एकाला वाचविण्यात यश

0
22
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत गेलेल्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला असून तिच्या भावाला मात्र वाचवण्यात यश आले आहे.

सविस्तर असे आहे की, मनीष यादव हे झेडटीसी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवसानंतर ते आज सकाळी विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळ असणार्‍या तापी नदीच्या पात्रात आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते. यावेळी पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या ही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. यातच मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली.

यामध्ये आर्यनराज याला वाचविण्यात यश आले असले तरी अनन्या मनीष यादव ही बालिका मात्र बुडाल्याने यादव परिवार शोकाकुल झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here