यावल, प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील प्रत्येक समाज आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे . त्या तुलनेत एस.बी.सी.समाज बांधवांनी मात्र आंदोलनाचा आक्रमक असा वेगळाच फंडा राबवला आहे . गटतट हेवेदावे हटवा-आरक्षण वाचवा हे ब्रीद वाक्य घेऊन आरक्षण चळवळ सप्ताह आयोजित केला आहे.
या आक्रमक चळवळीत गावागावातील एस.बी.सी . समाज बांधवांनी सहभागी व्हावे आणि सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडण्यासाठी लढा भक्कम करावा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष शशिकांतराव आमने यांनी केले आहे .
अधिक माहिती की . राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,मंत्री यांना आरक्षण मिळालेले असताना सुद्धा ते आणखी आरक्षण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.त्या तुलनेत राज्यातील एस.बी.सी अंतर्गत पोट जातीतील सर्वच समाज नेतृत्वहीन झालेला आहे . दिशाहीन झालेला आहे .
या समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडायला कोणालाही वेळ नाही . फक्त निवडणुकीपुढे . निवडणुकीच्या वेळेस मताचा जोगवा मागतात.प्रलोभने दाखवतात आणि निवडणुका झाल्यावर मात्र यामुळे समाज बांधव आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहतो आहे.
या समाजाला पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे यासाठी एस.बी.सी.अंतर्गत कोष्टी समाज चळवळीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतराव आमणे यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे.त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांना विशेष संदेश पाठवून आरक्षण सप्ताहामध्ये सहभागी होण्यास संदर्भात विशेष सूचना केल्या आहेत .
या आरक्षण सप्ताहाच्या चळवळीमध्ये अनेक आक्रमकतेचे प्रकार अवलंबण्याचा पवित्रा घेतला आहे . यामध्ये प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करून हा लढा अधिक आक्रमक करण्यासाठी आवाहन केले आहे.यामुळे निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना जाग येईल.आरक्षण मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अन्यथा भविष्यात त्याचे गंभीर परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील असाही परखड इशारा त्यांनी दिला आहे .
आरक्षण सप्ताहमध्य दि.1 नोव्हेंबर–सर्व तहसीलदार द्वारे मुख्यमंत्री,obcमंत्री यांना निवेदन. दि.3 नोव्हेंबर–सर्व जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन मुख्यमंत्री obcमंत्री यांना निवेदन . दि.5 नोव्हेंबर–सर्व 288 व78आमदारांना 48 खासदारांना निवेदन.दि.7 नोव्हेंबर– मुख्यमंत्री obc मंत्री यांना ई-मेल.दि.8 नोव्हेंबर– मुख्यमंत्री,obc मंत्री यांना SMS(मेसेज).दि.10 नोव्हेंबर–गावागावात प्रत्येक तलाठ्याद्वारे मुख्यमंत्री ,obc मंत्री यांना तर दि.11नोव्हेंबर–सर्व मंत्री, मुख्यमंत्री,आमदार खासदार यांना संघटनेद्वारे ई-मेल पाठवण्यात येणार आहे !
अशा प्रकारे जिथं जिथं s. b.c.समाज त्या त्या गावागावातुन, तालुक्यातून,जिल्ह्यातुन,राज्यात आरक्षण बचाव उपक्रम सकाळी 11वाजेपर्यंत उपरोक्त उपक्रम राबवून मोठी जनजागृती करून शासन व लोकप्रतिनिधीना आपल्या हक्काची जाणीव करून दिली जाणार आहे .
आरक्षण 50%च्या आत बसवण्यासाठी आता गट तट हटवा आरक्षण वाचवा हा एकसंधतचा नारा बुलंद केला जाणार आहे .
