Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसे यांचे राष्ट्रपतींना पत्र !
    जळगाव

    खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसे यांचे राष्ट्रपतींना पत्र !

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 8, 2025Updated:March 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसे यांचे राष्ट्रपतींना पत्र !

    जळगाव ( प्रतिनिधी ) –

    आज जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना धक्कादायक पत्र लिहिले आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणीचे पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. त्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे.

    रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे.

    देशात आणि राज्यात सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. या सामूहिक अत्याचाराचा उल्लेख करून त्यांनी पत्रात देशातील महिलांच्या असुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

    नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.

    आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.

    आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : स्वच्छतेवर कारवाईची चेतावणी महापौर दीपमाला काळे प्रशासनावर संताप

    February 17, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.