खा. रक्षाताई खडसे यांनी स्वखर्चाने दिली तीन लाखांची औषधी

0
13

रावेर : प्रतिनिधी
कोरोना काळात रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरणारी परंतु तुटवडा असलेल्या औषधीचा खासदार रक्षा खडसे यांनी गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून येथील ग्रामीण रुग्णलयातील कोविड रुग्णांसाठी स्वखर्चातून मोफत पुरवली आहेत. सुमारे तीन लाखाची औषधी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांच्या सुपूर्द करण्यात आली.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना बाधा झाल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. शासन स्तरावरून तसेच विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र रुग्णांवर औषधोपचार करताना काही औषधींचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून आले होते. तशा औषधीची यादी रुग्णालयाकडून खा. रक्षाताई खडसे यांनी मागितली होती. त्यानुसार ही औषधी मोफत देण्यात आली आहेत. तसेच उपचार घेणार्‍या रुग्णांची भेट घेऊन खा. खडसे यांनी त्यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली.
कोरोना हा एकट्याने लढण्याचा आजार नसून यासाठी सर्वानी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज आहे. रुग्णांसाठी आणखी काय सुविधा देता येतील, यावर वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून त्या उपलब्ध करून देण्यावर अधिक भर राहणार असल्याचे आश्वासन खा. रक्षाताई खडसे यांनी यावेळी दिले.
यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, बीडीओ दीपाली कोतवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिती सभापती कविता कोळी, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोपाळ नेमाडे, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, पंचायत समिती सदस्य माधुरी नेमाडे, जितू पाटील, योगिता वानखेडे, युवा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, मनोज श्रावक, संदीप सावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here