जळगाव, प्रतिनिधी । खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन, खान्देश जनसेवा फाऊंडेशन, नारीशक्ती गृप जळगाव, खान्देश न्युज नेटवर्क आणि इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय नारीदिप सन्मान-२०२१ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या ब्रिजलालभाऊ पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्रीताई महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे जळगाव , आमदार मंगेशदादा चव्हाण चाळीसगाव, धुळे येथील माजी महापौर जयश्री अहिरराव,युवती सहसंयोजिका अमृता पाटील धुळे ग.स.सोसायटी माजी अध्यक्ष विलास नेरकर, रावेर संगायो समीती अध्यक्ष तुकाराम बोरोले, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, नारीशक्ती गृप जळगाव अध्यक्षा मनिषा किशोर पाटील,ज्योती राणे इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थीत होते.
यावेळी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील तसेच देश विदेशातील महिलांना नारीदिप पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.खिरोदा येथील प्रा.डॉ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांचा यावेळी जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच भुसावळ येथील रहिवासी आणि सध्या कतार या देशात वास्तव्यास असलेल्या प्रा.अरुणा धाडे, आदर्श,स्मार्ट ग्राम चिनावल च्या सरपंच भावना योगेश बोरोले, रावेर पं.स.सदस्या योगिता वानखेडे, आरोग्य सेविका पल्लवी भारंबे यांच्यासह विविध क्षेत्रातील जवळपास ३० पेक्षा जास्त कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, अनुमोदन नारीशक्ती गृप अध्यक्षा मनिषा पाटील आणि सुत्रसंचलन ज्योती लिलाधर राणे यांनी केले.आभारप्रदर्शन संदिप पाटील यांनी केले.