चोपडा ः प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात राहणार्या चव्हाण कुटुंबियांची सुकन्या आणि एरंडोल तालुक्यातील कासोदा या गावातील सूर्यवंशी परिवाराची सून असलेली दीपिका चव्हाण-सूर्यवंशी सध्या ग्रँड पेरी, अल्बर्टा, कॅनडा येथे स्थायिक झालेल्या आहेत.
दि.२७ जुलै रोजी कॅनडातील एडमिंटन शहरात घेण्यात आलेल्या ‘व्हॉइस ऑफ एडमिंटन’ या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत दीपिका हिने सहभाग घेतला होता. जवळपास तीन महिने चाललेल्या या स्पर्धेत दीपिका हिने स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आणि ‘व्हॉंईस आँफ एडमिंटन’ या स्पर्धेच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेनंतर दीपिकाला पार्श्वगायिका म्हणून मिळालेल्या अतिशय सुंदर गाण्यांचे दीपीकाच्या सुरेल आवाजात व्हिडिओ ट्रॅकच्या आधारे रेकॉर्डिंग नुकतेच झाले असून ते २ डिसेंबर २०२० रोजी ‘एसएमआर एन्टरटेन्मेंट यू-ट्युब चॅनल’ वरून ते जागतिक स्तरावर प्रदर्शित झाले.
सर्व रसिकजनांनी या गाण्यांचा आनंद घ्यावा आणि खान्देशकन्या दीपिकाला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन दीपिका आणि प्रा.डॉ. अनंत देशमुख (चोपडा) यांनी केली आहे.