खरेदी खतात खोटे दस्तऐवज तयार करून फसवणूक : पाच जणांच्या विरोधात गुन्हा

0
7
बडतर्फ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून केला गोळीबार

भुसावळ | खरेदी खतात खोटे दस्तऐवज सादर करून शेतजमीन भरपाईची रक्कम आपल्या बँक खात्यात परस्पर वळती करण्याच्या प्रकरणी पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भुसावळ शहर पोलीस स्थानकात राजेश गंगाधर जोशी (रा.मॉडर्न रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मंगेश दीपचंद लढ्ढा (रा.बद्री प्लॉट, भुसावळ), प्रेमराज विठ्ठलदास बढे, महेंद्र शांतीलाल सुराणा (रा.गंगाराम प्लॉट,भुसावळ), ब्रजेश राधेश्याम लाहोटी (रा. गायत्री शक्तीपीठाजवळ, भुसावळ), स्मीता राजेश काकाणे (रा.वरणगाव) या पाचही संशयितांनी रजिस्टर खरेदी खतात लिहून देणार हा शब्द करून लिहून घेणार असा असा बनलून घेत योगेश गंगाधर जोशी यांच्या नावाची स्वाक्षरी नसलेला २ जुलै २०१३ या रोजीचा खोटा व बनावट स्टॅम्प बनवून सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्याकडे खोटे व बनावट दस्तावेज सादर केले. याचाच वापर करून २५ सप्टेंबर २०१३ ते १४ ऑक्टोबर २०१५ दरम्यान संपादित जमिनीची १३ लाख ७४ हजार ३१६ रुपयांची रक्कम बँक खात्यात वर्ग करून फिर्यादी व शासनाची फसवणूक केली असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मंगेश दीपचंद लढ्ढा (रा.बद्री प्लॉट, भुसावळ), प्रेमराज विठ्ठलदास बढे, महेंद्र शांतीलाल सुराणा (रा.गंगाराम प्लॉट,भुसावळ), ब्रजेश राधेश्याम लाहोटी (रा. गायत्री शक्तीपीठाजवळ, भुसावळ), स्मीता राजेश काकाणे (रा.वरणगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले तपास एपीआय विनोदकुमार गोसावी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here