खडसे समर्थकांच्या हाती आली वॉटरग्रेसची जंत्री

0
37

जळगाव ः प्रतिनिधी
दोन महिन्यांपुर्वी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथराव खडसेंनी महापालिका लक्ष केले आहे. त्यादृष्टीने काही दिवसांपुर्वी खडसे समर्थकांनी मागणी केलेले ‘वॉटरग्रेस’चे संपुर्ण दस्तऐवज त्यांच्या ताब्यात आले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात साफसफाई ठेक्यातील चुकांवर बोट ठेवत प्रशासनासह सत्ताधार्‍यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. मक्तेदाराकडून प्रशासनाची दिशाभूल होत असल्याचे उघड झाल्यामुळे प्रशासनाकडून याप्रकरणात सतर्कता दर्शवली जात आहे.
शहरातील साफसफाईसाठी महापालिकेसोबत करारनामा करताना वॉटरग्रेस कंपनीने परस्पर दुसर्‍या व्यक्ती अथवा संस्थेसोबत करारनामा करू नये, असे अटी व शर्तीत नमूद आहे. असे असतानाही वॉटरग्रेस कंपनीने परस्पर साई मार्केटींग सोबत करारनामा करत पोट ठेका दिला असल्याचे उघडकीस आले आहे. वॉटरग्रेसने पोट ठेकेदार नियुक्तीला नकार दिला असल्याने महापालिकेने थेट युनियन बँकेकडे माहिती मागीतली आहे. सोमवारी ती मिळू शकते. त्यानंतर नवीन विषय पुढे येण्याची शक्यता आहे.
अशी मिळवली माहिती
माजी नगरसेवक सुनिल माळी यांनी माहिती अधिकारात पालिकेतून तब्बल ५०० पानांची माहिती घेतली.यासाठी एक हजार रूपयांची फी अदा केली आहे.मिळवलेल्या माहितीत महापालिकेसोबत वॉटरग्रेसने केलेला करारनामा, महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेले सर्व ठराव, दंड व माफीबाबतचे कागदपत्र व भरणा केलेल्या धनादेशाच्या प्रती, मक्तेदाराने भरलेली अनामत रक्कम,इसारा रक्कम, सुरक्षा अनामतची माहिती,कामगार पगार स्लिप, ईएसआयसी, प्रोव्हीडंड फंड भरलेल्या कर्मचार्‍यांची नावे, कामावर हजर असलेल्या कामगारांची नावे व हजेरी रजिस्टर, कर्मचार्‍यांची बँक खात्याची माहिती, प्रकरण सुरू झाल्यापासून टिपणी अशा विविध माहितीचा समावेश आहे.
राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या…
करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य ओबीसी घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही श्री.भदाणे यांनी दिली आहे. या निवडीबद्दल भदाणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here