जळगाव, प्रतिनिधी । पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी पाथरी ग्रामची जत्रा भरत असते.तसी ती दोन तीन दिवसा पासूनच सुरूवात होते . मार्गशीर्षची अमावास्याला वर्षभरातून खंडेरायाला कबूल केलेले नवस फेडण्याचा दिवस असतो.सामुहीक जेवन करत असतात हा चांगल्या वागणूकीचा परीपाक आहे.या दिवसा पासून गावातीलच कर्तबगार तरुण बाहेर नौकरी निमित्ताने गेलेले,कितीही लांब म्हणजे सुरत हून गावचे मंडळी येत असतात .
दुसऱ्या दिवशी सकाळी घरोघर वरण, बट्टी ,वांग्याची घोटलेली भाजी साजुक तुप तेही केळीच्या पानावर सकाळी जय मल्हारला ,बहिरोबाला नैवेद दिला जातो ,सोबत श्रीफळ वाढवले जाते.अगरबतीचा घमघमाट तर विचारू नका मग घरोघरी आलेले पाहूणे सोबत जेवणाचा बेत मस्त पार पडतो.जेवनात केलेला गरमागरम स्वयंपाक ,गुळ,साखरेची मधूर जिलेबी ,चटकदार शेव केळीच्या पानावर इतकी भारी वाटते की ताजचे मेनू सुध्दा त्यापुढे फिकेच पडतील ढेकर येई पर्यंत जेवन वाढले जाते,केले जाते.
दुपारी चार वाजता एक तरुण खंडेरावचे रूप घेऊन ,साज अंगावर परीधान करून देवाचे वारे अंगात शिरते.मग बाबा थरथरायला लागतात करत अरण पाटील यांच्या गृहात स्थापन जागे पासून ते सर्व तरूण मंडळी मांतगचे डफडे,डि.जे.इ.वादय वाजत गाजत पुढे पंचवीस फुट झेंडाधारी ह.भ.प.सुकदेव कोळी हे आपली कसरत दाखवत उंच धरत पुढे ताकदीने चालत नाहीतर अक्षरशा पळतात…तरूण मंडळी पुढे डान्स करत ,ताल,ठेका धरत असतात.बारा बैलगाडया मुलां मुलींच्या भरलेल्या व पहिली गाडीवर धनगर समाजाचे नवरा बायकोचे जोडपे ,झेंडेधारी ,लक्ष ठेवून असलेले माणसं बसतात तेवढ्यात पाच फेऱ्या पूर्ण होतात मग खंडेरावला पहिल्या गाडीवान म्हणून व ओढणारे जय मल्हार म्हणून खूप लांब पर्यंत ओढून नेतात.मग टेकडीवर मंदिरात जाऊन अंगात आलेले वारे शांत होते.
गावचे लहान मुलं ,माणसं गृहलक्ष्मी नवे कपडे परीधान करून सर्व गाव खंडेराव टेकडी परिसरात जमा होतात ते दृश्य फारच मनमोहक दिसते.यात मुस्लिम, हिन्दू एकता दिसते.कारण मुस्लिम मुलं पण लांबून कुटुंबासह आलेले असतात ही खरी शक्ती ,एकता गावात दिसते.