जळगाव- शासकीय क्रीडा सप्ताहअंतर्गत बहिणाबाई माध्यमिक विद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाच्या विविध पुस्तकांच्या वाचनातून व साहित्यांच्या आधारे रुची वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात आले गिर्यारोहण अथवा ट्रेकिंग विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वामधील सुप्तगुणांना वाव देते आणि भविष्यात एक जबाबदार नागरिक बनवून नेतृत्वगुण सोबत त्यागाची भावना, धाडसीपणा , काटक ता ,स्वावलंबन असे गुण विकसित होतात असे डॉ. विलास नारखेडे यांनी क्रीडा सप्ताहप्रसंगी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक टी एस चौधरी यांनी प्रेरक वाचनामुळे धाडसी कृत्ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपणास मार्गदर्शक ठरतात असे मत व्यक्त केले. याप्रसंगी गिर्यारोहणासाठी आवश्यक कपडे व उपकरणे नकाशा वाचन हार्नेस ,रोप, बुट, अशाप्रकारे ट्रेकिंगची माहिती व उपयोग डॉ. विलास नारखेडे, संतोष पाटील यांनी दिली उपक्रमात सौ प्रतिभा खडके संतोष पाटील राजेश वाणी दुर्गादास कोल्हे इत्यादी सहभागी होती क्रीडा अधिकारी मिलिंद जी दिक्षित सुजाता गुल्हाने एम.के .पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.