Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»क्रीडा संकुलातील जुन्या गाळ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी उपसमिती नेमा
    जळगाव

    क्रीडा संकुलातील जुन्या गाळ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी उपसमिती नेमा

    saimat teamBy saimat teamMay 18, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी ५ जणांची उपसमिती नेमण्यात यावी. त्याचबरोबर जे गाळेधारक अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहेत. त्यांचे गाळे बंद आहेत त्यांना रितसर नोटीस देऊन त्यांचे गाळे जप्तीबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहे.
    जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत, शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यात अधिकाधिक दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, याकरिता जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नवीन निर्देशानुसार जिल्हा व तालुका क्रीडा संकुल उभारणीचा मसुदा नव्याने तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील ११ तालुक्यांच्या अपूर्ण क्रीडा संकुल बांधकामासाठी वाढीव निधी मागणीचा प्रस्तावही तयार करण्यात याव्यात. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांच्या सरावासाठी येणार्‍या खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधांबरोबरच चांगले मार्गदर्शक उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खेळाच्या सुविधा वापराचे दर माफक असावे अशी सूचना केली. बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांनी जिल्हा क्रीडा संकुलास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या बांधकामाचा, तेथील साहित्य, खेळाडूच्या सोईसुविधांचा आढावा घेतला. या वेळी क्रीडा संकुलातील कर्मचार्‍यांचे मानधन, संकुलातील गाळ्यामधील भागीदारीचे नाव रेकॉर्डवरुन कमी करणे, गाळे हस्तांतरण मान्यता, मनपा थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर यावर चर्चा करण्यात आली.
    जळगाव जिल्हा कुस्तीसाठी प्रसिध्द आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र केसरीसारखे खेळाडू आहेत. जिल्ह्यात अजून चांगले कुस्तीगीर निर्माण होण्यासाठी कुस्तीसाठी कोच मिळण्यासाठी क्रीडा आयुक्तांकडे मागणीचा प्रस्ताव पाठवा. ग्रामीण भागातही चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरिता निधीच्या उपलब्धतेनुसार खुल्या व्यायामशाळांना मंजूरी द्यावी. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचे अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी क्रीडामंत्र्यांशी चर्चा करणार असून जिल्हयात क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.