क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात अभिवादन

0
21

भुसावळ, प्रतिनिधी । स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या पाऊल वाटा महिलांसाठी खुल्या करून दिल्या नसत्या तर महिला खऱ्या अर्थाने सफल, शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली बनल्या नसत्या. सावित्रीबाईच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान बाळगत महिलांनी सावित्रीबाईंना अंतकरणात जपून ठेवल पाहिजे. असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादना च्या कार्यक्रमात बोलताना केले.

भुसावळ कला विज्ञान आणि , पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात स्टाफ ॲकॅडमी आणि एन.एस.एस अधिक दोन स्तर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्टाप अकॅडमीच्या चेअरमन प्रा एम आर गुजर, कला शाखेच्या समन्वयक , प्रा स्वाती पाटील, यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळेले, समन्वयक प्रा . एस सावंत, समन्वयक प्रा आर एम खेडकर, समन्वयक प्रा एन वाय पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा महेश सरोदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला म्हणजे सामर्थ्य, मांगल्य ,पावित्र्य, जिथे स्त्री शक्ती जागृत होते, कार्यप्रवण होते तिचे कार्यसंस्कृती हमखास यशस्वी होते, म्हणून महिलांनी सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून त्यापासून प्रेरणा घ्यावी. अपेक्षा याप्रसंगी बोलताना प्रा उत्तम सुरवाडे यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन भाऊ फालक , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ.भाग्यश्री भंगाळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम एच सरोदे, प्रा. एल पी टाक, प्रा जे.डी धांडे, प्रा आर पी मसाने, प्रा एस बी राजपूत, प्रा व्हि.डी सावकारे , शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here