मुंबई : प्रतिनिधी I राज्यांना कोरोना लसीचा योग्य पुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. 10 दिवस पुरेल इतका साठा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन लसींचा दहा दिवस पुरेल एवढा साठा आहे, असे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.
24 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे तसेच राज्य सरकारचा लस तुटवड्याचा दावा फेटाळून लावला आहे. महाराष्ट्र राज्याला 90 लाख लसीच्या डोसची गरज आहे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत 90 लाख लसी डोसची मागणी केली होती. जर पुरवठा झाला नाही तर लसीकरणाचे काम थांबेल, असे संकेत राजेश टोपे यांनी यावेळी दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण करण्यात आले असून टोपे यांचा दावा केंद्राने फेटाळला आहे. त्यामुळे लसीवरुन राजकारण आता पेटण्याची शक्यता आहे.
