मुंबई : प्रतिनिधी | राज्यात गेल्या 24 तासांत वाढले 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात 1 लाख 41हजार 492 कोरोना आणि 441 ओमायक्रॉनचे सक्रीय रुग्ण आहेत. त्यातच आता ऑक्सिजनची मागणी वाढ लागली आहे.त्यामुळे राज्य सरकार कोरोनाबाबतचे निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. आजच नवीन नियम जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मुंबईबद्दल सांगायचे झाले तर, शुक्रवारी येथे 20971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 8490 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतही शुक्रवारी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 1395 कोरोना रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.
कोरोनामुळे मुंबईतील 123 हून अधिक इमारती सील करण्यात आल्या असून सध्या येथे 6 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात सुमारे 364 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आजपासून नवीन लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.