यावल, प्रतिनिधी । येथील अतिप्राचीन श्री रेणुका देवी मंदिरात कोरोना नियम पाळत नवरात्र उत्सवानिमित्त स्री-पुरुष,ज्येष्ठ नागरिक,तसेच तरुण मुलं-मुली भाविकांची श्रद्धाळूंची मोठ्या संख्येने श्री रेणुका देवी आरती साठी दर्शनासाठी सकाळ व संध्याकाळ मोठ्या संख्येने उपस्थिती दिली जात आहे.
यासाठी मंदिराचे पुजारी तथा व्यवस्थापक विनोद बयाणी,राजू बयाणी सपत्नीसह नियोजन करीत आहेत त्याचप्रमाणे पोलिस होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यावल येथील श्री रेणुका देवी मंदिर हे सन1838पासून अति प्राचीन आणि जागृत असे असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये बोलली जात आहे.
नवरात्रीत सकाळी5वाजता आरती साठी यावल शहरातील अनेक महिला आपल्या घरातून प्रज्वलित दिवा श्री रेणुका देवी मंदिरात नेव-आण करीत असतात.तर संध्याकाळी7:45 वाजता सुद्धा यावल शहरातील अनेक भाविक श्रद्धाळू स्री- पुरुष मुलं-मुली ज्येष्ठ नागरिक श्री रेणुका देवी मंदिरात आरतीसाठी आणि दर्शनासाठी उपस्थित राहत असतात.