जळगाव ः प्रतिनिधी
शहरात काल कोरोनाचे नवीन २० रुग्ण वाढले तर २२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले.सध्या उपचार घेणार्या रुग्णांची संख्या २४८ आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी जळगाव शहर व जळगाव ग्रामीणमध्ये एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.
जळगाव शहरातील एकूण कोराना बाधित रुग्णांची संख्या आता १३ हजार २२१ तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ६८३ झाली आहे तसेच एकूण मृतांचा आकडा हा २९० झाला आहे.
महापालिका हद्दीत १ हजार ७०६ कंटेन्मेंट झोन असून त्यात ऍक्टिव्ह झोन सध्या ३६ आहेत. २ हजार १२४ टिमने ७३ हजार ६६५ घरांचे सर्वेक्षण केले. त्यात आयएलआयचे ३९ तर सारीचे १३ व इतर आजारांचे ३८८ रुग्ण समोर आले.
रोज बाधितांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याशिवाय पर्याय नाही.