कोरोनाच्या प्रतिकारासाठी दातृत्व अन् लोकसहभाग महत्त्वाचा : पालकमंत्री

0
11

पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी शासन आपल्या परीने निकराचे प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या समूळ उच्चाटनासाठी आज समाजाने दातृत्वाची भावना दाखवून लोकसहभागाच्या माध्यमातून मदत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रोटरी क्लब व लोकसहभागातून उभालेल्या कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन.पाटील होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, प्रांताधिकारी गोसावी, तहसीलदार देवरे, संभाजी चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे, संजय पाटील, सचिन पवार, प्रकाश पाटील, धनराज कासट आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, कोरोनाची वेळ ही घेण्याची नसून देण्याची आहे. पाळधी सेंटरमध्ये ३० जनरल बेड असून यासोबत येथे २५ ऑक्सिजन बेड आणि पाच मिनी व्हेंटिलेटर्सची व्यवस्था आहे. रूग्णांना उपचारासाठी याचा उपयोग होणार आहे. या कोविड केअरच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी संयुक्तरित्या उचलली आहे.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या पुढाकाराने हे सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.
डॉ. सुशील गुजर, डॉ. महेंद्र मल, डॉ.अपर्णा मकासरे, डॉ.पराग पवार हे या कोविड सेंटरमध्ये सेवा देणार असून गरज भासल्यास ५० वरून १०० बेडची व्यवस्था करणार असे प्रतापराव पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकसहभागातील दाते
गुलाबराव पाटील फाउंंडेशन,सुगोकी ग्रुप, कासट स्टोन,बी एन ए इन्फ्रास्ट्रक्चर, उदय कृषी केंद्र,एन एस जैन,एस पी डेव्हलपर्स, लक्ष्मी नारायण सन्स, संभाजी चव्हाण, रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स, अनिल सोमाणी, चंदन कळमकर, अरुण पाटील, चंदू माळी, भिकन नन्नवरे, किशोर पाटील, भागवत शेठ, मुन्ना पलोड, प्रताप पाटील मित्र परिवार ग्रुपने सहकार्य केल्याने कमी कालावधीत कोविड सेंटर उभारता आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here