कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित

0
14

जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरीकांची अडवणूक होवू नये,याकरीता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त येणार्‍या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निश्चित केला आहे.
मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.
टाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७/ स्वराज माझदाच्या प्रकारच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये,वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंधित प्रसिध्दीपत्रक, अर्ज, वैयक्तिक निवेदने, खुलासा, जाहिरात प्रसिध्दी व इतर पत्रव्यवहार वक्षवळेक्षरश्रसरेपसारळश्र.लेा या ईमेलवर पाठवावा. कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन वेळेनंतर अत्यंत महत्वाचे प्रसिध्दीपत्रक तातडीने प्रसिध्दीस देणे आवश्यक असल्यास शासकीय कार्यालयांनी ते जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांच्या ९८७०९३४९६२ या व्हॅटसअप क्रमांकावर पाठवावे तसेच वृत्तपत्रात प्रसिध्दीस द्यावयाच्या शासकीय जाहिराती प्रसिध्दीच्या दिनांकापूर्वी किमान तीन दिवस अगोदर कार्यालयाच्या ईमेलवर पाठवाव्यात.
अत्यंत महत्वाचे काम असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२५७/२२२९६२८ वर संपर्क साधावा. कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकारांसह अभ्यागत व शासकीय कार्यालयांनी ३० एप्रिल, २०२१ पर्यत सहकार्य करावे असे आवाहन श्री. बोडके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here