कोरोनाचा कहर: रेमडेसिव्हरचा तुटवडा ; जळगावच्या मुस्लिम बिरादरीचा दिलासा

0
15

जळगाव ः प्रतिनिधी
चोपडा, जामनेर, एरंडोल येथील शासकीय कोवीड सेंटर मध्ये रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने के. परवीन मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअरच्या माध्यमाने या रुग्णांना दिलासा देऊन फक्त ७४९ रुपयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले त्यावेळी रुग्णांच्या प्रतिक्रिया अत्यंत वेदनादायी अशा होत्या.
कोविड महामारी प्रसंगी इंजेक्शनचा तुटवडा, तसेच इंजेक्शनसाठी सुरू असलेला काळाबाजार बघितला असता बिरादरीने सदर प्रकरणी जळगाव व मुंबईच्या आपल्या मित्रपरिवाराशी संपर्क साधून रेमडेसिव्हर उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांना दिलासा मिळालेला आहे.
जिल्हा बाहेरील रुग्णांची मागणी
जळगाव जिल्हा मध्ये जसा तुटवडा आहे तसाच जिल्हा बाहेरील नाशिक, बुलढाणा, नंदुरबार ,शहादा येथे तुटवडा झाल्याने जळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांना कागदपत्रे घेऊन तातडीचे म्हणून प्रत्येकी दोन इंजेक्शन देण्यात आलेले आहे.
जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने कालही सुमारे १५७ रुग्णांना दिलासा दिला असून त्यात गरीब १३ रुग्णांना मोफत इंजेक्शन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here