मलकापूर प्रतिनिधी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी केले.
यावेळी मलकापूर शहर पोलीस स्टेशन च्या प्रांगणात 19 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या शिवजयंती उत्सव निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विचार मंचावर मलकापूर शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत , एम आय डी सी पोलीस निरीक्षक आनंद महाजन , मलकापूर ग्रामीण पोलिस निरीक्षक मिर्झा, तहसीलदार राजेश सुरडकर, यांची उपस्थिती होती.
तर शहर पोलिस स्टेशनच्या या बैठकीला आई तुळजा भवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाधव , समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाईअशांत वानखेडे , अॅड. दिलीप बगाडे, राजेंद्र वाडेकर,पिरिपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, रीपाई नेते सु.मा. शिंदे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोकराव सुरळकर, रमेशसिंगदादा राजपूत,अप्पा प्रतिष्ठान अध्यक्ष चेतनआप्पा जगताप , पत्रकार सतीश दांडगे, समद कुरेशी, हाजी रशिदख़ाँ जमादार, मोहन शर्मा दिलीप गोडीवाले, अमोल टप, ज्ञानदेव तायडे यासह आदी मान्यवर शांतता समिती सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.