जळगाव ः प्रतिनिधी
जामनेरचे कादंबरीकार डॉ. अशोक कौतिक कोळी यांना ‘श्रीमती कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सातारा येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
खान्देशात बोलल्या जाणार्या ‘तावडी बोली’ला जाणीवपूर्वक आपल्या कथात्म साहित्यातून अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे मोलाचे काम अशोक कोळी यांनी केलेले आहे.‘आपल्याला मिळालेला सन्मान हा तावडी बोलीचा सन्मान आहे’,अशी भावना त्यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.
