कै.श्रीमती सिंधुताई रोकडे गौरव पुरस्काराचे झाले वितरण संपन्न….

0
9

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

सोयगांव येथील समाजसेवक दत्तु रोकडे हे आपल्या आईच्या नावाने श्रीमती सिंधुताई रोकडे या नावाने दरवर्षी सामाजिक,पोलीस,शिक्षण व इतर क्षेत्रात विशिष्ट कार्य कार्यरत असणार्या लोकांचा गौरव २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी करत असतात. या वर्षी करोना सारख्या महामारीत उत्कृष्ट असे कार्य करणारे सोयगांव पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,व शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असणारे सोयगाव येथील सोयगाव केंद्रप्रमुख मोतीराम जोहरे व तर गलवाडा येथील नवकवी गोपाल इंगळे यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून.सर्व गौरवार्थींचे समाजसेवक दत्तू रोकडे,मुख्याध्यापक रामदास फुसे,राजेंद्र दुतोंडे,कदीर शहा,समाजसेवक विष्णू मापारी मुख्याध्यापक किरण पाटील,रवींद्र तायडे,झगाजी पोतरे,सुदर्शन चौधरी,शेख सय्यद,नसीर शेख,प्रशांत पाटील यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here