जळगाव प्रतिनिधी .येथील के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज ची जयंती निमित्त विशेष कार्यक्रम मुख्याध्यापक श्री अकिल खान ब्यावली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असुन एक कुशल दुरदृष्टी व स्वाभिमानी राजा होते आज ची हि त्रासदीच म्हणावें लागले की एका महान व एकात्मता चे प्रतिक महान राजा चे परिचय एका विशिष्ट समुदायाची ओळख म्हणून प्रचलित होत चालली आहे म्हणून इतिहासकार व जानकारांची जबाबदारी आहे ती समाजा समोर वास्तविकता आनावी, शेख तबरेज़ यांनी हि महाराजांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी चे वर्णन करुन माहिती दिली. आमेना जीनत इयत्ता ८वी ने हि माहिती सादर केली, कार्यक्रमा ची सुरुवात ज़रफीन ने कुरआन पठण करून केले. तन्वीर शेख,असता शेख,लइक शाह, उपस्थित होते आभार मझहरुदिन शेख यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागा ने परिश्रम घेतले.