जळगाव ः प्रतिनिधी
केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी ३० गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला. आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर आणि टीम यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नेरी नाका येथील पांचाळ वस्तीत राहणार्या नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक उपासमार होत आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यात आली.
प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, चना डाळ, तुरडाळ, तेल, आटा, साखर, चहा पावडर, मीठ, हळद, मिरची पावडर या वस्तू देण्यात आल्या. गोळवलकर रक्तपेढीचे संचालक विवेक पलोड यांच्या आर्थिक सहकार्यातून शिधा वाटप करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा पलोड, भानुदास येवलेकर, सागर येवले, कुणाल शुक्ला, हर्षल दुसाने उपस्थित होते.