केशवस्मृतीतर्फे आशादीप वसतिगृहास दोन पाळणे भेट

0
40

जळगाव : प्रतिनिधी
केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गणेश कॉलनी येथील आशादीप महिला वसतिगृहास शिशुंसाठी दोन पाळणे भेट देण्यात आले. परितक्त्या महिला, कुमारी माता, पीडित-शोषित महिलांसाठी गणेश कॉलनी येथे आशादीप महिला वसतिगृह चालवले जाते. अनेक महिलांसोबत असणार्‍या आपल्या बाळांसाठी या शिशुगृहात पाळण्याची सोय नव्हती. या मुलांना झोळी करून झोपवण्याची व्यवस्था केली जात होती. ही अडचण लक्षात घेऊन केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आशादीप महिला वसतिगृहास दोन पाळणे भेट देऊन वसतिगृहाच्या अधिक्षिका जयश्री पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
आपल्या बाळांसाठी मिळालेल्या पाळण्यांमुळे तेथील महिलांना आनंद झाला व त्यांनी चाईल्ड लाईनचे कौतुक केले. या वेळी चाईल्ड लाईनचे समन्वयक भानुदास येवलेकर, समुपदेशिका वृषाली जोशी, टिम सदस्य रोहन सोनगडा, राहुल महिरे, समतोलच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव, सेवावस्ती विभागाच्या व्यवस्थापिका स्नेहा तायडे, नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका राजश्री डोलारे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here