जळगाव ः प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यासाठी सर्व कायकर्ते मेहनत घेतील. संघटन अधिक मजबुत होण्यासाठीही मदत होईल,असा विश्वास भाजपच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी भाजप कार्यालय वसंतस्मृती,बळीराम पेठ येथे सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील ९ मंडळातील बुथवर आणि कार्यकर्त्यांच्या घरावर ध्वजारोहण करण्यात आले.
पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते पक्ष ध्वजवंदन करण्यात आले.प्रदेश उपाध्यक्षा माजी आमदार स्मिताताई वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व जिल्हा उपाध्यक्षा शरीफा तडवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, माजी महापौर भारतीताई सोनवणे, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी,नितीन इंगळे,अमित भाटीया,सुशील हासवाणी, उज्ज्वला बेंडाळे,राजेंद्र मराठे, महेश चौधरी, भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर,दीपक साखरे, गणेश माळी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, अजित राणे,संजय लुला,शक्ति महाजन,केदार देशपांडे, नगरसेवक जितेंद्र मराठे,सुरेश सोनवणे,गायत्री राणे,ऍड. शुचिता हाडा, कैलास सोनवणे, विजय पाटील, विजय वानखेडे, पिंटू काळे, संजय चौधरी, संजय विसपुते, दीप्ती चिरमाडे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, अशोक राठी, जयेश भावसार, लता बाविस्कर, प्रवीण जाधव, दीपक बाविस्कर, प्रभाकर तायडे, प्रमोद वाणी, हेमंत जोशी, अरुण श्रीखंडे, गणेश वाणी, संजय एम. शर्मा, सचिन बाविस्कर, गौरव पाटील, भूषण पाटील, अबोली पाटील, जितेंद्र चौथे, दिनेश पुरोहित, भूषण कुळकर्णी, चंदू महाले, माजी नगरसेवक उदय भालेराव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नेत्यांच्या आठवणी जागवल्या
जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी पक्षाचा ४१ वर्षांचा लेखाजोखा मुद्देसूदपणे सादर केला. जनसंघ ते भाजप प्रवासात जळगाव जिल्ह्यात योगदान दिलेल्या नेत्यांच्या आठवणी या प्रसंगी जागवण्यात आल्या. पक्षाची ध्येयधोरणे, केंद्र सरकारच्या योजना याबाबत माहिती देण्यात आली.