केंद्र शासनाने बनविलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करा

0
14

जळगाव ः प्रतिनिधी
केंद्र शासनाने बनविलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी व शेतकरी तसेच मध्यमवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेले विज विधेयक रद्द करावे, या मागण्यांसाठी छावा मराठा युवा महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाअंतर्गत १८ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत विविध संघटनातर्फे कृषी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २२ रोजी आंदोलनाचा ५ वा दिवस होता.
घोषणांनी दणाणला परिसर
यावेळी आंदोलकांनी जय जवान जय किसान, किसान बचाओ देश बचाओ, संविधान बचाओ देश बचाओ, लडेंगे जितेंगे आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी अमोल कोल्हे, मुकुंद सपकाळे, फारुख शेख, हरिश्चंद्र सोनवणे, प्रीतीलाल पवार यांनी मार्गदर्शन केले.
छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र कोळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला सोनवणे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, मणियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, सचिव कुणाल पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष नेमाडे, शिवसेनेचे मनपा गटनेते अनंत जोशी, नगरसेवक अमर जैन, मेहरूण विकासोचे चेअरमन निरंजन पाटील, लेवा विकास महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, शहिद भगतसिंग महानगरपालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनिल नाटेकर, राष्ट्रीय ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूनाथ सैंदाणे, पत्रकार प्रविण सपकाळे, राष्ट्रसेवा दलचे अ‍ॅड. कोमल गोंधळी, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे महानगराध्यक्ष अतुल महाजन, कास्ट्रईब कर्मचारी संघटनेचे रमेश सोनवणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत मोरे, महानगर अध्यक्ष भैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश जाधव, किरण ठाकूर, उज्वल पाटील, संतोष महाले, कृष्णा जमदाडे, राहुल नेवे, कार्तिक असेरी, मयुरेश जैस्वाल, गणेश कुवर, फईम पटेल, भारत सोनवणे, राजू कोळी, अकिल शेख, फारुख कादरी, वीर सावरकर रिक्षा युनियन अध्यक्ष दिलीप सपकाळे, आर.पि.आयचे प्रवीण परदेशी, शहर काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार, पीपल्स फाऊंडेशनच्या गायत्री सोनवणे यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here