Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»कृषी कायद्याविरुद्ध संघटितपणे लढा द्या-आ.शिरीष चौधरी
    यावल

    कृषी कायद्याविरुद्ध संघटितपणे लढा द्या-आ.शिरीष चौधरी

    saimat teamBy saimat teamFebruary 8, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः प्रतिनिधी

    केंद्र शासनाच्या दडपशाहीमुळे देशातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या काळ्या कायद्याला तात्काळ रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यापासून दिल्ली येथे शेतकरी बांधव आंदोलनास बसले आहेत. त्यांना पाठबळ व पाठींबा देण्यासाठी यावल येथे यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष तथा आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांनी व्यक्त केले.

    यावल येथे यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणार्‍या शेतकरी बांधवाच्या संघर्षमय आंदोलनास पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीस दिल्ली येथे आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनात मृत्युमुखी झालेल्या १५५ शेतकर्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाला स्वातंत्र मिळाले त्या स्वातंत्र चळवळीला काँग्रेस पक्षाने ऐतिहासीक असे संघर्ष करून देशाला स्वातंत्र मिळवून दिले असून, आता देखील केंद्रातील दडपशाही मार्गाने  काळे कायदे करणार्‍या केंद्र सरकारच्या तावडीतून देशाच्या अन्नदाता शेतकरी बांधवांना मुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष हा शेतकर्‍यांच्या पाठिशी असल्याचे मनोगत काँग्रेसच्या मान्यवरांनी व्यक्त केले. याप्रसंगी शेतकरी मेळाव्यास उपस्थित तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तसेच नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले पक्षाचे सदस्य व भावी सरपंच यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

    यावेळी माजी आ.रमेश चौधरी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जि.प.चे गटनेते प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य आर. जी.पाटील, डी.जी.पाटील, श्रीधर चौधरी, राहुल बाहेती, पं.स.चे गटनेते शेखर पाटील, पं.स.सदस्य सरफराज तडवी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, नगरसेवक असलम शेख नबी, समीर शेख मोमीन, हाजी गफ्फार शाह, अनुसुचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शबाना तडवी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याची प्रस्तावना प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केली तर सुत्रसंचलन अमोल भिरूड यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.