कुर्‍हा परिसरातील भाजपा पदाधिकार्‍यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0
38

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
तालुक्यातील कुर्‍हा परिसरातील भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचे नेतृत्वाखाली कुर्‍हा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात २६ जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला त्यात भाजपाचे तालुका सरचिटणीस, विद्यमान कुर्‍हा उपसरपंच, विद्यमान ७ ग्रामपंचायत सदस्य , ३ माजी ग्रामपंचायत सदस्य, भाजपाचे सक्रिय सदस्य अशा २६ जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कुर्‍हा परिसरात भाजपाला खिंडार पडले आहे.
माजीमंत्री खडसे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवुन कुर्‍हा येथे २६ भाजपा पदाधिकारी,सक्रीय कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
त्यात कुर्‍ह्याचे माजी सरपंच डॉ.बी.सी.महाजन, सदस्य पुंडलिक कपले,अनिल पांडे,डॉ.गजानन खिरडकर, अनंता पाटील,रमेश खिरडकर,सोपान खिरडकर, प्रदीपपुरी गोसावी, राजेंद्र शर्मा,नरसिंग चव्हाण,दिनेश जैस्वाल, अरुण वसतकार, विलास हिरोळे,अरुण काकडे, गजानन कवळे,सुरेश काळे, प्रमोद गवळे, रुपचंद गवळे,जलील मास्टर, सैफुल्ला ठेकेदार,असिफ ठेकेदार, ईश्वर खिरडकर, सरदार राठोड,जोगींदर भोसले,अक्काबाई भोसले,बल्लु भोसले यांचा समावेश आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, विशाल महाराज खोले, रामभाऊ पाटील, दशरथ कांडेलकर,विजय सोनार, डी.के.पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here