‘कुछ मिला क्या?’ निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा सवाल

0
14

मुंबई, वृत्तसंस्था । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली. एक हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत.

यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 2010 मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“या सरकारमध्ये विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई होत असतात आणि आमच्या सारखे लोक नेहमी सहन करत असतात. 2024 पर्यंत आम्ही हे सहन करु. राजकीय सुडबुद्धीच्या या कारवाया होत आहेत. त्यांचा तपास आमच्याभोवती सुरु आहे. मी त्यांना विचारतो की, कुछ मिला क्या. हा एक खेळ सुरु आहे,”अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

भांडवली तरतुदींपैकी केवळ 46 टक्के खर्च
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली 1040 कोटी रुपयांच्या म्हाडाच्या जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने राऊतला आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने सांगितले की, राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here