Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल
    क्राईम

    कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, ११ महिलांवर गुन्हा दाखल

    saimat teamBy saimat teamDecember 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा, प्रतिनिधी । शहरातील एका परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून २३ तरुणींची सुटका केली असून यात ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल २३ तरूणींची सुटका करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांच्या पथकाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

    यात जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल २३ तरूणी आढळून आलेत. सर्व तरूणींचे सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणात कुंटनखाना चालविणाऱ्या ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले. या परीसरात मध्यप्रदेश, आंध्रा, पश्चिम बंगाल, कलकत्तासह नेपाळमधील तरूणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार केल्या जात आहे. वारंवार कारवाया होऊन सुद्धा या परिसरात देह व्यापार केली जात होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.